Google Ad
Editor Choice Pune

औंध गणेश खिंड रोड येथील विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अतिरिक्त सचिव डॉ . जी . श्रीनिवास यांचे ह्रदयविकाराने दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज : औंध गणेश खिंड रोड येथील विश्वविद्यालय अनुदान आयाेगाचे अतिरिक्त सचिव डॉ. जी. श्रीनिवास ( वय ५५) रा. पुणे यांचे ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सदैव दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्रीनिवास यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली आहे. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे करीत असे. संकटकाळी धावून जाणारे श्रीनिवास वेळप्रसगी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन मदत करत असत.

त्यांच्या अचानक जाण्याने कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांना धक्का बसला आहे. डॉ. जी. श्रीनिवास यांच्या मूळगावी हैदराबाद येथे त्यांचे अंतीम संस्कार करण्यात आले. विश्वविद्यालय अनुदान आयाेग, पश्चीम विभागीय कार्यालय पुणे, संयुक्त सचिव डाॅ. आर. मनाेज कुमार, शिक्षक अधिकारी श्री. विनाेद सिंग यादव, डाॅ. संजय नेगी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने त्यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!