Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गरजु महिला व मुलींना ६ महिन्यांचे “सॅनिटरी नॅपकीन” वाटप … भाजयुमो तर्फे शहरात आणखी एक स्तुत्य सामाजिक ऊपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक २५ आॅक्टोबर २०२० रोजी भारतीय जनता युवा मोर्चा “युवती विभाग” तर्फे २०० गरजु महिला व मुलींना ६ महिन्यांचे सॅनिटरी नॅपकीन देण्यात आले. नेहमी आपल्या सामाजिक कार्यात समाजातील विविध घटकांसाठी काही ना काही ऊपक्रम राबवनार्या युवा मोर्चातील काही युवतींनी यावेळेस “नवरात्री व दुर्गा महोत्सवात” गरजु महिलांसाठी काहीतरी वेगळ व आरोग्यविषयक करण्याच ठरल.

विषय ठरला “सॅनिटरी नॅपकीन व जनजागृती”, त्यात काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसनार्या महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी ऊपयुक्त अशा गोष्टी विकत घेता येत नाही, तसेच आरोग्यविषयक एक योग्य माहिती मिळत नाही. अशावेळी शहरातील भारतीय जनता युवा मोर्चातील युवतींनी यासाठी पुढाकार घेऊन २०० महिलांना अर्धा वर्षभर पुरेल एवढे सॅनिटरी नॅपकीन देण्यात आले.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहराच्या युवती विभागाच्या सोशियल मिडीया संयोजिका पुजा आल्हाट, युवा मोर्चा चिटणीस मुक्त गोसावी यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती प्रदेश सह संयोजिका वैशाली खाडये, अलका वाघुले, विजया आल्हाट, सुजाता बोराटे, सुरेखा बनकर, सिंधू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!