Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण … ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ते सध्या मुंबईतील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. काही दिवसांपासून अजित पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना थकवा आणि कणकण जाणवत होती. त्यामुळे अजित पवार घरातच क्वारंटाईन झाले होते. तसेच त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणीदेखील केली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. पंरतू आता पुन्हा एकदा अजित पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यापूर्वीही ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच देशातील महत्त्वाच्या राजकीय मंडळींपासून अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. काही राजकीय मंडळींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून काही जण अजूनही उपचार घेत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून तेदेखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!