Google Ad
Uncategorized

दातदुखीमुळे झालं Omicron व्हेरिएंटचं निदान; पिंपरी चिंचवडमधील 12 वर्षीय मुलीसह संपूर्ण कुटुंबाला लागण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ डिसेंबर) : देशातील सर्वांत जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही एका 12 वर्षांच्या मुलीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे, कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नसताना या मुलीला असलेल्या दातदुखीमुळे ओमिक्रॉनचे निदान होण्यास मदत झाली. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

24 नोव्हेंबर रोजी एक 12 वर्षांची मुलगी नायजेरियाहून पिंपरी चिंचवडला परतली होती. यानंतर तिला दातदुखीचा त्रास सुरू झाला. त्यासाठी तिने एका डेन्टिस्टची अपॉइन्टमेंट घेतली होती. मात्र, कोरोनाच्या नियमांनुसार डॉक्टरने या मुलीची आरटी-पीसीआर चाचणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या चाचणीमुळे मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

Google Ad

यानंतर तिच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली. पहिल्या कोरोना चाचणीमध्ये तिच्या कुटुंबातील चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, खात्रीसाठी दुसरी चाचणी घेतल्यानंतर या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सर्वांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

साधारणपणे आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीला असलेल्या लक्षणांवरून होम क्वारंटाईन करायचं की रुग्णालयात दाखल करायचे हे ठरवतात. मात्र, या प्रकरणात ही मुलगी ‘धोकादायक’ यादीतील देशातून आली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या सर्वांचे सॅम्पल्स ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी एनआयव्हीला (NIV) पाठवण्यात आले होते. यानंतर कुटुंबातील सर्वांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. या कुटुंबात एका 18 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. या बाळालाही ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

हे सर्व लोक असिम्प्टोमॅटिक आहेत. तसेच, या सर्वांना मल्टिव्हिटॅमिन्सचा नियमित डोस देण्यात येत आहे. त्यांची दुहेरी कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रामध्ये रविवारी (12 डिसेंबर) ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण नागपूर (Nagpur Omicron case) शहरात आढळून आल्यामुळे आता विदर्भातही ओमिक्रॉनची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही 40 वर्षांची व्यक्ती दक्षिण आफ्रिकेहून 5 डिसेंबरला परत आली होती. सध्या राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये 10 रुग्ण आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!