Google Ad
Editor Choice Uncategorized

मराठवाडा जनविकास संघ आणि जय भगवान महासंघातर्फे गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१२ डिसेंबर) : मराठवाडा जनविकास संघ आणि जय भगवान महासंघ यांच्या संयुक्तपणे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ७२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, एक दिवस समाजासाठी फाऊडेशनचे अजय मुंडे, जिओ फाऊडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती काळे, ह.भ.प. तांदळे महाराज, जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश ढाकणे, विकास आघाव, उद्योजक अमोलभाऊ नागरगोजे, डॉ. नारायण जायभाये, सी.ए. एकनाथ मुंडे, प्रा. मारोती वाघमारे, बजरंग आंधळे, विजय माने, सागर बेंद्रे, महादेव मासाळ, सुहास बारटक्के, रविंद्र शिंदे, अनिल गायकवाड, बालाजी वाघमारे, निलेश सानप, विजय डमाले, किशोर आट्टरगेकर, उमाकांत सानप, अमोल लोंढे, दादाराव घंटे, विजय मुळीक, शंकर तांबे, किशोर वीर, उर्दीत अस्वरे, दत्तात्रय धोंडगे आदी उपस्थित होते.

Google Ad

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले, की गोपीनाथ मुंडे हे एक संघर्षयोद्धे होते. मुंडे यांच्या कार्याचा वसा घेऊन आपण हे समाजकार्य सतत चालू ठेवू. गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांचे कार्य आपणास निश्चितच प्रेरणादायी व बोधप्रद असेच होते. त्यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. स्वाभिमान व संघर्ष हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ होते.

उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात माझा गणपती दूध पीत नाही, असे ठणकावून सांगत अंधश्रद्धेचे काहूर शमविले होते. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती. आपणही एकत्रितरित्या सर्वसामान्यांसाठी काम करू, असे आवाहनही पवार यांनी केले.
गणेश ढाकणे म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारितेला वाव दिला. गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरभरून लिहिल्याविना महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते, तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडे असायचे. आज गोपीनाथ मुंडे हवे होते.

ह.भ.प. तांदळे महाराज यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची माहिती दिली. गोपीनाथ मुंडे यांनी चालवलेला संघर्षाचा वारसा यापुढेही चालू ठेवू, असे मत अजय मुंडे यांनी व्यक्त केले; तर डॉ. प्रीती काळे यांनी मुंडे साहेब व देशमुख साहेबांच्या मैत्रीला उजाळा दिला. डॉ. नारायण जायभाये, विकास आघाव यांनीही भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत फड यांनी, तर आभार दत्तात्रय धोंडगे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!