Google Ad
Uncategorized

उद्या पासून शाळेची घंटा वाजणार ! पिंपरी चिंचवड मध्ये उद्यापासून १ ते ७ वी शाळा सुरू… असे, आहेत आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ डिसेंबर) : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हळूहळू राज्यातील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास मनपाने परवानगी दिली आहे.

राजेश पाटील , आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , यांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये इयत्ता १ ली ते ७ वी चे नियमित वर्ग दिनांक १६.१२.२०२१ पासून सुरु करणेत येत असल्याची माहिती दिली आहे.

Google Ad

▶️असे आहेत, आदेश / मार्गदर्शक सूचना

( १ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता १ ते ७ चे नियमित वर्ग दि . १६.१२.२०२१ पासून सुरु करणेस परवानगी देण्यात येत आहे .

२ ) शाळा सुरु करणेबाबत मा . महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडील दि . ०७.०७.२०२१ . दि . १०.०८,२०२१ दि . २४.० ९ .२०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटी ( SOP ) व दिनांक २ ९ .११.२०२१ रोजी मा . शासन परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील .

( ३ ) मा . महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांनी इयत्ता १ ली ते ७ वी चे नियमित वर्ग सुरक्षितपणे सुरु करणेबाबत दि . २ ९ .११.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना यासोबत संलग्न केले आहेत . त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील .

४ ) शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणेकामी Thermometer . Thermal Scanner / Gun Pulse Ox meter , जंतुनाशक , साबण , पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यात यावी ,

५ ) शाळेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा – यांचे कोविड १९ लसीकरणाचे २ मात्रा ( डोस ) पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा – यांना ४८ तासापूर्वीची RT PCR चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवण्यात यावे .

( ६ ) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा – यांचे कोविड १ ९ लसीकरण पूर्ण करुन घेण्यात यावे .

( ७ ) वर्ग , खोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर ( Physical Distance ) च्या नियमानुसार असावे .

८ ) शाळेत दर्शनी भागावर शारीरिक अंतर ( Physical Distance ) , मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मागदर्शक सूचना posters / stickers लावण्यात यावे . शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतके शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हांकन करण्यात यावे , शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा – या बाणांच्या खुणा करण्यात याव्यात , याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील .

९ ) विद्याथ्र्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी . 2/13 १० ) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा , स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जतुकीकरण करण्यात यावे . याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील … ( ११ ) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१ ९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाच / मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०. तसंच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील .

सदर आदेश दि . १६.१२.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दि . १५.१२.२०२१ रोजी दिलेला आहे .

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नव्हती. त्यात, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!