Google Ad
Editor Choice Pune

Pune : महाराष्ट्रात शेतकरी आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नाही … उपमुख्यमंत्री ‘अजित पवार’ यांची घोषणा

महाराष्ट्र 14 न्यूज : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले . दरम्यान शेतकरी विधेयकाच्या विरोधात देशभरातून आंदोलन होत आहे . महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे . याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे .

पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हा निर्णय जाहीर केला . अजित पवार म्हणाले की , ‘ आम्ही सध्या कायदेशीर अभ्यास करत आहोत , ही बिले घाईत मंजूर झाली आहेत . आम्ही राज्यात याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेऊ . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही या बिलाचा विरोध केला जात आहे . ‘ केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर त्याबाबत देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत . त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास हे विधेयक मंजूर करणार नाही .

Google Ad

मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करणार असून कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.पवार म्हणाले की , केंद्राचे कृषी विधेयक शेतकयांचे फायद्याचे नाही.परंतु अंमलबजावणी केली नाही तर काय परिणाम होतील , न्यायालयात गेले तर काय होईल याबाबत अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल . राज्यात शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्वयामुळे धोक्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

34 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!