Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : कोरोनामुळे दीक्षाभूमीवरील धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द … स्मारक समितीचा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण साधेपणानं साजरे झाले . अशातच मोठ्या उत्साहात साजरा होणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे . राज्यातील तसेच नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याचं दीक्षाभूमी स्मारक समितीने सांगितलं आहे . धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .

दरवर्षी १४ ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात . १४ ऑक्टोबरला डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असते . पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द केला आहे . भारतभरातून येणाऱ्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो . त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचीव सुधीर फुलझेले यांनी सांगितलं .

Google Ad

सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं . त्याचबरोबर सर्वांनी धम्म चक्र प्रवर्तनाचा सोहळा अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन फुलझेले यांनी केलं आहे . तसेच आपापल्या घरी राहूनच सर्वांनी प्रार्थना करावी असंही सुधीर फुलझेले यांनी म्हटलं आहे . दरम्यान दीक्षाभूमी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबरोबरच राजकीय नेत्यांचंही विशेष आकर्षण राहिलेली आहे .

पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते . विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार झाल्यावर रोहित पवार , धीरज देशमुख यांनीही दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांचे दर्शन घेतले होते . २०१८ मध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेत्यांनी हजेरी लावत आंबेडकरी जनतेला संबोधित केले होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!