Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

समस्त सांगवीकरांच्या घरगुती गणपती विसर्जनाची तयारी झाली … ‘प्रशांत शितोळे’ यांनी बनविले ‘विघ्नहर्ता विसर्जन रथ’

महाराष्ट्र 14 न्यूज : समस्त सांगवीकरांच्या घरगुती गणपती विसर्जनाची तयारी झाली…….

घरीच रहा || सुरक्षित रहा ||
तुम्ही खबरदारी घ्या||
आम्ही जबाबदार घेतो ||

घराघरात गणपतीचीस्थापना होऊन पाच दिवस होऊन गेले, कोरोनाच्या या संकट काळात आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन कसे करायचे? हा यक्ष प्रश्न सर्वापुढे उभा राहिला . या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि सिझन ग्रुप सोशेल वेल्फेअर ट्रस्ट चे अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी शोधले आणि समस्त सांगवीकर नागरिकांना विनम्र आवाहन करून हा प्रश्न सोडविला.

Google Ad

आपल्या घरातील श्री गणपती बाप्पाचे विसर्जनासाठी आम्ही सज्ज असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोठेही गर्दी न करता, आपल्या घरातील गणरायाची मूर्ती आपल्या इच्छेनुसार आमच्याकडे सुपूर्द करावी, असे आवाहन सर्व गणेश भक्तांना त्यांनी केले आहे, त्याकरिता आकर्षक असे ‘मूर्ती संकलन रथ’ तयार केले आहेत.

महानगरपालिका प्रशासन व सांगवी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनातून गणरायाचे विधीवत विसर्जन/मूर्तीदान/पर्यावरण पूरक व्यवस्था केली जाणार आहे. विघ्नहर्ता रथामध्ये आपल्या बाप्पाची मूर्ती दिमाखात विसर्जन ठिकाणी नेली जाईल. असे ‘प्रशांत शितोळे’ यांनी बोलताना सांगितले.

कोरोना रुपी विघ्न दूर होऊन आपल्या देशात सुख -शांती – समाधान लाभो याच प्रार्थनेने गणरायाला निरोप देऊया व पुढील वर्षी बाप्पाचे स्वागत मोठ्या दिमाखात करूयात..
सांगवीतील प्रत्येक परिसरात विघ्नहर्ता रथाची व्यवस्था केली असून, आपण आपल्या घरातील गणपती बाप्पाची आरती सकाळीच करून घ्यावी व त्यानंतर रथामध्ये बाप्पांची मूर्ती सुपूर्द करावी व आपण घरीच थांबावे अशी विनंती त्यांनी सर्व गणेश भक्तांना केली आहे.

!! घरीच रहा !! सुरक्षित रहा !!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!