Google Ad
Editor Choice india

Delhi : 1 मे पासून केंद्र सरकारचा लसीकरणासाठी काय आहे, मास्टर प्लॅन? कोणाकोणाला मिळणार लस…

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतात 100 टक्के कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्रातून मागील अनेक दिवसांपासून होत असलेली मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केलीय. यानुसार देशातील 18 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. यामुळे भारतात वेगाने लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे 100 टक्के कोरोना लसीकरणाकडे भारताने आगेकूच सुरु केलीय. यासाठी केंद्र सरकारने मास्टर प्लॅन बनवला आहे. यात कोरोना लसींचं उत्पादन, वितरण आणि लसीकरण याविषयी सविस्तर रणनीती तयार करण्यात आलीय.

Google Ad

कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने सुरुवातीला कोविड योद्धे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

🔴केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन काय?

▶️स्थानिक कोरोना लसीची गरज पाहून निर्णय घेण्यासाठी लस उत्पादक आणि राज्य सरकारांना अधिकार.

▶️18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिक लसीकरण घेण्यास पात्र असणार.

▶️लस उत्पादकांना लस उत्पादनात वाढ करण्यासाठी नव्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादक कंपन्यांना यात सहभागी करुन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार.

▶️लस उत्पादकांना त्यांच्याकडील 50 टक्के लस साठा राज्य सरकारला देण्याची परवानगी देण्यात आलीय. याशिवाय पूर्वनियोजित किमतीनुसार या कोरोना लस खुल्या बाजारात देखील उपलब्ध करुन देऊ शकणार.

▶️राज्य सरकारांना थेट कोरोना लस उत्पादक कंपन्यांकडून अतिरिक्त कोरोना लसी मिळवण्याबाबत आणि 18 वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला लसीकरण देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार.

▶️याशिवाय सरकारच्यावतीने वयाच्या प्राधान्यक्रमानुसार नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचाही कार्यक्रम सुरुच राहणार.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!