Google Ad
Editor Choice Pune District

Junner : गुढीपाडव्याला घेतला होता नवाकोरा ट्रॅक्टर , बाप – लेकासाठी तोच ठरला काळ !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१९ :  गुढीपाडव्याला घेतलेला नवाकोरा ट्रॅक्टरचा वडील आणि मुलासाठी काळ ठरला. पुण्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या अपघातात बापलेकाला मृत्यू झाला आहे. शेतीच्या मशागतीसाठी जाताना हा अपघात झाल्याचं कळतंय. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील राळेगण येथे हा अपघात झाला आहे. कल्याण येथील पोलीस ठाण्यामधे कार्यरत असलेले 56 वर्षीय सोपान उडे सुट्टी घेऊन गावाला आले होते.

नुकताच गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता. ट्रॅक्टर चालक संदेश तळपे, सोपान उडे आणि त्यांचा 20 वर्षीय मुलगा तेजस शेतीच्या मशागतीसाठी शेतावर चालले होते. चढणीच्या रस्त्यावर अंदाज न आल्याने ट्रॅक्टर 20 फूट खोल असलेल्या बाजूच्या शेतात कोसळला. त्यामध्ये वडील-मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे.

Google Ad

दरम्यान, पुण्यात एका निर्दयी बापाने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. या बापाने आपली मुलगी एका मुलाशी बोलते याचा राग धरत पोटच्या दोन्ही मुलींना ठार मारलं. मुलींना चालत्या ट्रकसमोर झोपवत या बापाने त्यांच्या अंगावर ट्रक घातल्याची घटना समोर आली होती. आपल्या दोन मुलींचा जीव घेत या बापाने स्वत:लासुद्धा संपवलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!