Google Ad
Editor Choice india

Delhi :सुप्रीम कोर्टाकडून कर्जदारांना दिलासा … बँकांना दिले ‘ हे ‘ महत्वाचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने कर्जवसुली स्थागित प्रकरणी मंगळवारी (दि. 23) अंतिम निकाल जाहीर केला. न्यायालयाने थकीत कर्ज हप्त्यांवर व्याजावर व्याज आकारू नये, असे आदेश दिले आहे. तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसुल केल्या आहेत. त्यांनी पुढील हप्त्यामध्ये ते समायोजित करावे, असे सांगत न्यायालयाने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे लोन मोरॅटोरिम सुविधेने कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला होता.

मात्र या सुविधा आणखी काही काळ सुरु राहावी म्हणून काही व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आज अंतिम निकाल जाहीर केला आहे. न्यायालयात 17 डिसेंबर रोजी लोन मोरॅटोरिम आणि त्यावरील व्याज वसुलीसंदर्भात अंतिम युक्तिवाद झाला होता. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठाने याबाबत निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज न्यायाधीश डी. व्हाय चंद्रचुड , न्यायाधीश एम. आर शाह आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने अंतिम निकाल जाहीर केला आहे.

Google Ad

सुनावणीवेळी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की लोन मोरॅटोरिममध्ये व्याजावर व्याज किंवा दंडात्मक व्याज कोणत्याही कर्जदारावर आकारू नये. आतापर्यंत व्याजावर व्याज जे वसूल केले असेल ते पुढील मासिक हप्त्यामंध्ये समायोजित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच जे कर्जबुडवे असतील अशांकडून मात्र व्याज वसूल करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने लोन मोरॅटोरिमला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. तसेच लोन मोरॅटोरिम कालावधीत संपूर्ण व्याजमाफी होणार नाही हे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!