Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विस्फोट … आज धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

महाराष्ट्र 14 न्यूज, (२३ मार्च २०२१) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पिंपरी चिंचवड आणि पुण्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. शाळा आणि महाविद्यालयं बंद असूनही कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार( दि.२३ मार्च २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १५१९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८१२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – आकुर्डी ( ६४ वर्षे ) , पिं.सौदागर ( ६६ वर्षे ) , चिंचवड ( ७६ वर्षे ) , मोशी ( ६ ९ वर्षे ) , वल्लभनगर ( ६८ वर्षे ) , कासारवाडी ( ७६ वर्षे ) , दापोडी ( ६५ वर्षे ) , चिखली ( ६ ९ वर्षे ) , ०२ स्त्री – पिंपरी ( ७५ वर्षे ) , भोसरी ( ७२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – खेड ( ५४ वर्षेषे ) , वडगा शेरी ( ६७ वर्षे ) , ०१ स्त्री- पुणे ( ७२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १६९
ब – २६१
क – १३७
ड – २७७
इ – १६७
फ – १७१
ग – २००
ह – १३७
एकुण – १५१९

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!