Google Ad
Editor Choice india

Delhi : चीनसोबत तणाव सुरु असतानाच … बीआरओने बांधलेल्या ४३ पुलांचं आज संरक्षणमंत्र्यांनी केले उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज : देशाच्या सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित म्हणूनच देशाच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. देशाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह देशाच्या सीमेलगतच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 43 पुलांचं ई-उद्घाटन करणार आहेत. हे सर्व पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओने बांधले आहेत. यासोबत 6 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहतांग टनेलचं उद्घाटन करणार आहेत.

‘या’ ठिकाणी पुलांची निर्मिती संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बीआरओने बनवलेल्या 43 पैकी 10 पूल जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. सात पूल लडाख, दोन पूल हिमाचल प्रदेश, चार पूल पंजाब, आठ पूल उत्तराखंड, आठ पूल अरुणाचल प्रदेश आणि चार पूर सिक्कीममध्ये आहेत. या सर्व पुलांचं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील.

Google Ad

यावेळी हिमाचल प्रदेश, पंजाब, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाखचे उपराज्यपालही उपस्थित असतील. यासबोतच बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांचीही हजेरी असेल. 43 पैकी 22 पूल एकट्या भारत-चीन सीमेवर देशातील विविध राज्यांना लागून असलेल्या सीमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेल्या पुलांचं एकाच वेळी उद्घाटन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असतानाच बीआरओने दिवस-रात्र एक करुन सीमांवरील नदी-नाल्यांवर पूल बांधले आहेत. 42 पैकी 22 पूल एकट्या चीन सीमेवर आहेत. यापैकी एक पूल हिमाचल प्रदेशच्या दारचामध्ये तयार केला असून त्याची लांबी सुमारे 350 मीटर आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या पुलांसह राजनाथ सिंह यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगसाठी असलेल्या निचिफू टनेलचं भूमिपूजन करतील. या टनेलची निर्मितीही बीआरओ करत आहे. या टनेलचं बांधकाम पूर्ण झाल्यावर एलएसीवरील महत्त्वाच्या असलेल्या तवांगपर्यंतचा प्रवास सोपा होईल आणि वेळेचीही बचत होईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!