Google Ad
Editor Choice Pune

Pune : ऊसतोड मजुरांचा संपाचा तिढा सुटला … यंदा १४ टक्के वाढीचा दिग्गज नेत्यांच्या बैठकीनंतर एकमताने निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस असे दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘ऊस तोड कामगार आणि संघटनांची बैठक पुणे येथे पार पडली. 2020-21 ते 2022 ते 2023 असा करार झाला आहे. यावर्षी 14 टक्के वाढ मिळणार आहे. सर्व संघटनांनी संप मागे घेतला आहे.

Google Ad

कामगारांनी आपल्याला आपल्या ठरलेल्या कारखान्यांवर कामासाठी जावं’, असं आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. शेतकरी आणि ऊसतोड मजूर हे साखर संघाचेच घटक आहेत, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांनी अधिक न ताणता 21 रुपयांची दरवाढ मिळाली तर ऊसतोडणीसाठी निघावे, अशी भूमिका घेतली होती.

यामुळे ऊसतोड आंदोलनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमनेसामने आले होते. काही संघटनांच्या हट्टामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. अन्यथा हा प्रश्न दोन महिन्यांपूर्वीच निकाली निघाला असता, असा टोला पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना लगावला होता. ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अधिवेशनात राज्य सरकारने यासाठी कायदा मंजूर करावा. ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या मजुरीत 85 टक्के वाढ झाली पाहिजे. अन्यथा दोन महिन्यांनी पुन्हा संप करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!