Google Ad
Editor Choice india

Delhi : कोविड -19 लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापनाबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक

महाराष्ट्र14 न्यूज : पंतप्रधानांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि शिक्षण संस्थेसह वैज्ञानिक बांधवाना संपूर्ण मानवजातीसाठी काम करण्याचे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील कोविड -19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती वितरण आणि व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सदस्य (आरोग्य) नीती आयोग, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पंतप्रधान कार्यालयाचे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोविड रुग्णांच्या दररोजच्या संख्येत आणि वाढीच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

भारतात तीन लसी विकासाच्या प्रगत टप्प्यात आहेत, त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात आणि एक तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथके अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांबरोबर सहकार्य करत असून संशोधन क्षमता मजबूत करत आहेत. बांगलादेश, म्यानमार,कतार आणि भूतानकडून त्यांच्या देशांमध्ये क्लिनिकल चाचण्यांसाठी विनंती केली जात आहे.

Google Ad

जागतिक समुदायाला मदत करण्याच्या प्रयत्नासाठी पंतप्रधानांनी सूचना केली की आपण लस वितरण प्रणालीसाठी लसी, औषधे आणि आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न शेजारी देशांपुरते मर्यादित ठेवू नये तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत.कोविड -19 (एनईजीव्हीएसी) साठी लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटाने राज्य सरकार आणि सर्व संबंधित हितधारकांशी सल्लामसलत करून लसीचा साठा, वितरण आणि व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा तयार केला आणि सादर केला.राज्यांशी सल्लामसलत करून तज्ज्ञ गट लस प्राधान्य आणि लस वितरणावर सक्रियपणे कार्य करत आहे.पंतप्रधानांनी देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता लक्षात घेऊन लस उपलब्धता जलद गतीने सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!