Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Bhosri : विजेच्या लपंडावा बाबत महावितरणच्या अधिकाऱ्या बरोबर चिखली, मोशी, च-होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची बैठक!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१८ ऑक्टोबर ) : स्वराज सहकारी गृहनिर्माण संस्था मोशी येथे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची बैठक झाली. या बैठकीत मागील बऱ्याच दिवसापासून चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव परिसरातील वीज ( लाईट ) सतत जाते येते, त्यामुळे सोसायट्यांच्यामधील सदस्यांना त्रास होतो, बरेच सदस्य सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना तसेच 10 वी, 12 वीचे विद्यार्थी यांना खूप त्रास होतो, आशा भावना बैठकेला उपस्थित सर्व सदस्यांनी मांडल्या

महावितरण कडून जर हे असेच चालत राहिले तर लोकांच्या नोकऱ्यावर गदा येईल,तसेच वीज गेल्यावर ती दिवस- दिवस 24 तास येत नाही, त्यामुळे सोसायट्यांच्या जनरेटरवर (DG वर) लागणाऱ्या डिझेलचा लाखो रुपये खर्च कोण देणार?… जर महावितरण कडून हे सर्व थांबले नाही तर महावितरण विरुद्ध मोठे आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी यावेळी दिला.

Google Ad

सततच्या व जास्त वेळ जाणाऱ्या वीज प्रवाहामुळे महिला वर्गास खूप त्रास सहन करावा लागत आहे व आता महिलांची सहनशीलता संपत चालली आहे , त्यामुळे महावितरणने लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा सोसायट्यांच्यामधील महिलांचा उद्रेक होऊ शकतो आशा भावना महिलांच्या वतीने निलम हुले यांनी मांडल्या. स्वराज सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी रात्रभर व दिवसभर लाईट नव्हती व हे सतत 15 दिवसातून अनेकवेळा असेच होते हा प्रश्न लवकर सोडवण्याची विनंती फेडरेशनचे सदस्य व स्वराज सोसायटीमधील रहिवासी बलाप्पा माने यांनी केली.

सदर सभेस महावितरणचे मोशी विभागाचे कनिष्ठ अभियंता वरुडे उपस्थित होते, त्यांनी स्वराजचा विषय व ही समस्या महावितरणची नाही, यात महावितरणची काहीही चूक नाही, स्वराज सोसायटीचे बिल्डर यांनी स्वराजसाठी वेगळे असणारे सबस्टेशन मागील पाच वर्षांपासून चालुच केलेले नाही, रिव्हर सोसायटीमधून स्वराजसाठी ज्या केबल टाकलेल्या आहेत,त्यापैकी एक केबल चार्जच केलेली नाही, त्यामुळे स्वराजसाठी सतत लाईट जाण्याची समस्या निर्माण होते, बिल्डरनी स्वराजसाठी वेगळे असणारे सबस्टेशनचे बाकी राहिलेले काम बिल्डरनी लवकर केले तर स्वराज सोसायटीचा प्रश्न सुटेल असे वरुडे यांनी म्हटले, तसेच चिखली,मोशी,चऱ्होली व डुडुळगाव परिसरसतील लाईट आता सतत जाणार नाही, याची पूर्ण दक्षता महावितरण घेईल.

 

सदर बैठकीमधून फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून स्वराज सोसायटीचा विषय सांगीतल्यार आमदार लांडगे म्हटले ‘ते स्वराज सोसायटीच्या बिल्डरसी बोलुन पुढील 20 दिवसात स्वराज सोसायटीसाठीचे वेगळे सबस्टेशनचे काम करून देण्याचे सांगतो व हे काम करून घेतले जाईल असे महेश लांडगे यावेळी म्हटले.

सदर सभेसाठी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे, स्वराज सोसायटीचे चेअरमन मस्के , कोअरकमिटी सदस्य उडाने, स्वराजच्या कोअरकमिटी सदस्या व भाजपाच्या नेत्या निलम हुले, फेडरेशनचे इतर पदाधिकारी व स्वराज सोसायटीचे सदस्य,आमदार महेश लांडगे यांचे कार्यालयीन प्रतिनिधी ऋषभ खरात, महावितरण मोशी उपविभागाचे कनिष्ठ अभियंता वरुडे हे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!