Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्रात तो पुन्हा बरसणार… कोणत्या दिवशी कुठे येणार?

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🔴राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता :-

Google Ad

⛈️सोमवार :-
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

⛈️मंगळवार :-
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

⛈️बुधवार :-
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही.  राज्य सरकारकडून पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिलेला नाही.

अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, अशी शेतकरी पुत्रांची भावना आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!