Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका ‘निर्मला कुटे’ यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून आरोग्य कर्मचाऱ्यांना केले आरोग्य उपयोगी वस्तूंचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन, आज शुक्रवार दि.९ ऑक्टोबर रोजी नगरसेविका सौ.निर्मलाताई संजय कुटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागामधे कोरोना साथीच्या महामारीत प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी महानगरपालिका सफ़ाई कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत कार्यरत असतात.

अशा परिस्थितीत त्या कर्मचारयांचे आरोग्य सुरक्षित रहावे याकरीता आणि प्रभागातिल महिला बचत गटांना व २५० महिला कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे सोशल फ़ाउंडेशन च्या वतीने स्टीम(वाफेच्या)मशीन्स चे वाटप करण्यात आले.

Google Ad

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पु)काटे, कामगार नेते बबनराव झिंजुर्डे,नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, जयनाथ शेठ काटे, शेखर(आण्णा) कुटे संदीप नखाते(स्वीकृत-नगरसदस्य) सौ.कुंदाताई भिसे(सरचिटणीस भा.ज.पा महिला मोर्चा),कपिल कुंजीर, अरूण चाबुकस्वार, देवा आप्पा नखाते,राकेश भास्कर, पत्रकार. शिवप्रसाद डांगे, संदेश पुजारी आरोग्य विभागाचे अधिकारी सौदाई, विजय धनवटे, ह.भ.प संपत मेटे, सुनील वाघमारे ईतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

115 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!