Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३,००,००० ( तीन लाख ) कोविड- १९ लसीकरण चा टप्पा पुर्ण “

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ एप्रिल) : ” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३,००,००० ( तीन लाख ) कोविड- १९ लसीकरण चा टप्पा पुर्ण ” झाला असून, केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम दि .१६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे .

नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर , वय वर्ष ४५ वरील व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येत आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दि .२३ / ०३ / २०२१ रोजी एक लाखाचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण केलेला आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दि .०६ / ०४ / २०२१ रोजी दोन लाखाचा लसीकरणाचा टप्पा पुर्ण केलेला आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दि .१७ / ०४ / २०२१ रोजी तीन लाखाचा लसीकरणाचा टप्पा पुर्ण करण्यात आला आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६२ व २९ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि .१६ जानेवारी २०२१ ते आज पर्यंत ३,०३,३४९ ( तीन लाख तीन हजार एकोणपन्नास ) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे .

आरोग्य सेवा देणारे HCW ३५४४३, फ्रंन्ट लाईन वर्कर ३०८३५ , वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत चे १२७६३०, वय वर्षे ६० वरील १०९४४१ असे एकुण ३०३३४९ नागरिकांना कोविड-१९ लसीकरण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की , पिंपरी चिंचवड शहरामधील वय वर्ष ४५ वरील नागरिकांनी त्यांनी महानगरपालिकेच्या नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे . तसेच कोविड -१९ प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केल्यानंतर सॅनिटायझर चा वापर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे बंधनकारक आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!