Google Ad
Editor Choice Pune

पिंपळे गुरव, निगडी, भोसरी, वाकड, दिघी, काळेवाडीत आढळले कोरोना पॉझिटीव्ह … रुग्णांवर औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार!

महाराष्ट्र 14 न्यूज : जिल्हा रूग्णालय औंध सांगवी पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार ( २३ ऑगस्ट २०२० ) रोजी आज अखेर एकुण १६३४ संशयीत रुग्ण दाखल करणेत आले, त्यापैकी एकुण ७९७ रुग्णांना कोरोना लागण असलेबाबत आढळून आले आहे. आज एकुण २५ कोरोना बाधीत रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यातील पिंपरीचिंचवड शहरातील पिंपळे गुरव, रुग्ण हे आदर्श नगर नवी सांगवी, मयूर नागरी फेज २ पिंपळे गुरव देवकर पार्क,काटेपुरम, स्वामी समर्थ सोसायटी भोसरी, निगडी, सिद्धार्थ वरकट बिल्डिंग विशाल नगर, कस्पटे वस्ती वाकड, चौधरी पार्क वाकड, तनिष्क होम दिघी, नर्सेस quarter औंध हॉस्पिटल, काळेवाडी फाटा वाकड, चिंचवड , मगरपट्टा हडपसर,शिवाजी चौक औंध, मुखेड पुणे येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.


एकूण ५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ३४ रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आज नवीन ३ संशयीत दाखल केलेले रूग्ण हे पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड परिसरातील आहेत. सर्व रुग्णांवर डॉ किरण खलाटे, डॉ शर्मिला गायकवाड , डॉ अशोक नांदापुरकर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ भगवान काकणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ संतोष देशपांडे निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!