Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज आढळले ७५० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण … तर ७९२ रुग्ण झाले कोरोना मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. २३ ऑगस्ट २०२० ) रोजी ७५७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ७५० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज ७९२ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले ११ रुग्ण हे काळेवाडी (स्त्री ५० वर्षे, स्त्री ६३ वर्षे), चिंचवड (स्त्री ७३ वर्षे), थेरगाव (पुरुष ४६ वर्षे), निगडी (स्त्री ४५ वर्षे), सांगवी (पुरुष ८२ वर्ष), जुन्नर (पुरुष ५० वर्षे), आंबेगाव (पुरुष ३९ वर्षे, स्त्री ६५ वर्षे), खेड (पुरुष ७२ वर्षे), धानोरी (पुरुष ५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

74 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!