Google Ad
Editor Choice Maharashtra

Ahamadnagar : विरोधकांकडून आरोपांची मालिका कशासाठी? रोहित पवारांचं सूचक ट्विट

महाराष्ट्र 14 न्यूज : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असं सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचं पवार यांना या ट्विटमधून सूचित करायचं आहे.

रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतची माहिती मीडियाला दिली. मात्र, त्याचवेळी पवारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात आले. पुरावे म्हणून देशमुखांचे व्हिडीओही दाखवण्यात आले.

Google Ad

पत्रकारांकडे हे सर्व मुद्दे आले कुठून?, त्यांना कोण माहिती पुरवत होतं? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवारांची पीसी सुरू होताच भाजपचे सर्व नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. पवारांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होते. तसेच बरीच माहितीही पुरवत होते. यामागे भाजपचा मोठा प्लान दिसतोय, असं पवार म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!