Google Ad
Editor Choice

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं वृद्धापकाळाने निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे 3.30 वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, तेजस्वी शतक देवाच्या चरणी विसावतो… आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे. त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, जी नेहमी लक्षात ठेवली जाते की शहाणपणाने काम करा आणि शुद्धतेने जीवन जगा.

Google Ad

हिराबेन मोदी यांची प्रकृती बुधवारी सकाळी खालावली. त्यांना तातडीने अहमदाबाद येथील यूएन मेहता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी दिल्लीहून थेट अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. माताजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते दीड तास येथे राहिले आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला परतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन मोदी यांचं अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना झाले आहेत.देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!