Google Ad
Editor Choice india

Delhi : नवीन घर खरेदी करताय? घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय … जाणून घ्या , Income Tax मध्ये कशी मिळवाल सूट!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारने नवीन घर खरेदी करू इच्छिणा-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने नवीन घर खरेदीवरील सर्कल रेटवरील सूट 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा करताना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमत असलेली घर सर्कल रेटपेक्षा कमी किमतीत विकल्यास आयकरामध्ये सूट मिळणार असल्याचे सांगितले. सरकारच्या या घोषणेमुळे रेसिडेन्शिअल रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळणार असून, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकता.

विक्रेता आणि खरेदीदारांसाठी आयकरात सूट मिळवण्यासाठी आहेत नवीन नियम :-
1) तुम्ही विकत घेत असलेले घर किंवा फ्लॅट नवीन असावा, रिसेलच्या फ्लॅटवर ही सूट मिळणार नाही.
2) घराची किंमत 2 कोटी रुपयांहून कमी असावी.
3) या सुविधेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेऊ शकता.

Google Ad

काय आहेत फायदे –
1) सेक्शन 43C आणि 50C अंतर्गत खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही टॅक्स भरावा लागत होता.
2) स्टॅम्प ड्यूटी आणि अ‍ॅग्रिमेंट व्हॅल्यूवर 10% हून अधिक रकमेवर LTCG टॅक्स भरावा लागत होता.
आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 अंतर्गत केली होती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 अंतर्गत याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 2,65,080 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. तसेच उदयोगांबरोबर शेतमजूर, मजूर, शेतकरी आणि मध्यमवर्गालादेखील दिलासा दिला होता. त्याशिवाय घर खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही आयकरातून सूट मिळणार आहे. सर्कल रेट आणि अ‍ॅग्रिमेंट व्हॅल्यूमध्ये फरक 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळी गिफ्टवर असा लागणार जीएसटी
जर तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचे बास्केट बनवून एखादी भेट दिली, तर जीएसटी लागू असलेल्या वस्तू एकत्र करून दिल्यामुळे पॅकेजिंगवर जीएसटी लागू होईल, तर बास्केटमध्ये ज्या वस्तूवर सर्वाधिक जीएसटी लागणार आहे. त्यानुसार हा जीएसटी संपूर्ण बास्केटवर आकारला जाईल. त्यामुळे ज्या वस्तूंवर जीएसटी नाही, त्यावरदेखील जीएसटी भरावा लागणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!