Google Ad
Editor Choice Education Maharashtra

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट , राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत , ६२ उमेदवार रिंगणात!

महाराष्ट्र 14 न्यूज ; विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून 62 उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील नेते प्रताप माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Google Ad

प्रताप माने यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. प्रताप माने यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.
भाजपनं संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. रयत क्रांती संघटनेतर्फे प्रा. एन.डी. चौगुले यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अखेर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवार पदवीधरची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

पुणे पदवीधरमधून 16 जणांची माघार
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी 16 अर्ज मुदत संपेपर्यंत मागे घेण्यात आले. त्यामुळे आता पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षांच्या 13 उमेदवारांसह 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर, प्रमुख लढत राष्ट्रवादीच्या अरुण लाड आणि भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार रिंगणात
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून 15 जणांनी माघार घेतली. आता या जागेवर 35 जणांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसनं जंयत आसनगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, 2014 च्या निवडणुकीत विजयी झालेले दत्तात्रय सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. भाजपनं या मतदरासंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

पुणे पदवीधर मतदारसंघ 2014 निकाल
उमेदवार मते
चंद्रकांत पाटील (विजयी) ६१,४५३
सारंग पाटील ५९,०७३
अरुण लाड ३७,१८९
शैला गोडसे १०,५९४
शरद पाटील ८,५१९

पुणे शिक्षक प्रमुख उमेदवार
जयंत आसनगावकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!