Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या निकाल गुरुवारी (ता.१२) जाहीर करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे एक लाख ३६ हजार ८२१ विद्यार्थी, तर आठवीचे ५७ हजार ५६७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

त्यातील पाचवीच्या १६ हजार ६८४ विद्यार्थ्यांना, तर आठवीच्या १४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले . पाचवीचे सोळा तर आठवीचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून , पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले आहेत .

Google Ad

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील १२ हजार ७२४ विद्यार्थ्यानी ही शिष्यवृत्ती दिली . पाचवीच्या सात हजार ९४६ विद्यार्थ्यांनी , आठवीच्या चार हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती . त्यात महापालिकेच्या पिंपळे गुरव शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा घवघवीत यश मिळवीत पाचवीतील विद्यार्थ्यांनी अंजली त्रिमुखे , अनुसया स्वामी , वैष्णवी सगर , राम कुलकर्णी , स्नेहा मालकट्टे , कलावती जमादार ( पिंपळे गुरव प्राथमिक शाळा ) ,
यांचे यादीत नाव झळकले आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!