Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राम मंदिर भूमिपूजन … लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही … भाजप शहराध्यक्ष ‘महेश लांडगे’ यांना नोटीस!

महाराष्ट्र 14 न्यूज : बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते भूमीपुजन सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जय्यत तयारी देखील सुरू केली होती. याच तयारीचा एक भाग म्हणजे शहरातील वेगवेगळ्या ४० ठिकाणी दहा लाख लाडू वाटण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

परंतु साध्य कोरोनाच्या संसर्गाचा कहर शहरात दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने शासनाच्या आदेशात म्हटल्या प्रमाणे पोलिस प्रशासनाने भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना एका नोटीस द्वारे कळविण्यात आले आहे की सी आर पी सी १४ ९ प्रमाणे, आपण राममंदीर भुमी पुजन अनुषंगाने उदया दिनांक -०५/०८/२०२० रोजी ठिक ठिकाणी लाडु वाटुन आनंद साजरा करणार असल्याबाबत माहिती मिळालेली आहे.सध्या कोरोनाचा वाढता प्राधुभाव लक्षात घेता लाडु वाटप करणे योग्य ठरणार नाही , तरी आपण सदरचा लाडु वाटपाचा कार्यक्रम करु नये , सदर कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल असे या नोटिशीत म्हटले आहे. सदर नोटीस ही पोलिसनिरीक्षक एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन यांनी दिली असल्याचे समजते.

Google Ad

त्यामुळे लाडू वाटप कार्यक्रमच्या आनंदावर विरजण पडणार हे मात्र नक्की, कोरोनाच्या संसर्गाचे भान ठेवून, हा ऐतिहासिक सोहळा सामूहिक रित्या करणे मुख्यत्वे टाळा, कोरोना बाबत काळजी घ्या, असे आवाहनही आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना केलेही होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!