Google Ad
Education Pimpri Chinchwad

महानगरपालिका शाळेतही … परिस्थितीवर मात करत ‘गोमती’ ने घडविला दहावीत उज्वल इतिहास!

महाराष्ट्र 14 न्यूज : कधी कधी विपरीत परिस्थितीत जिद्द व चिकाटी असेल तर यश हमखास मिळते. असेच यश पिंपळे गुरव येथील ‘गोमती बचनराम साहू ‘ हिने सिद्ध करून दाखविले आहे. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवत आपल्या शाळेचे व आई वडिलांचे नाव मोठे केले आहे.

गोमती, ही पिंपळे गुरव येथील साठ फुटीरोड वरील गुलमोहोर कॉलनीत एका दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहते. दररोज शाळेत पायी चालत जाते. तिच्याकडे असणाऱ्या जिद्दीच्या जोरावर तीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादीत केले आहे. गोमतीच्या आई वडिलांची परिस्थिती तशी नाजूक आहे. दोघेही आई वडील पिंपळे गुरव येथे बिगारी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा एस.वाय. ला आहे. आता त्यांच्या लहान मुलीने दहावीत गोमतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. गोमती आई वडील बिगारी कामाला जात असल्याने घरच्या सगळ्या कामात ती मदत करीत असते.

Google Ad

आईला दम्याचा त्रास असल्याने तिचे उपचार करायचे आहे. पण परिस्थिती हालाकीची आहे. यासाठी तिने डॉक्टर होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच तिचे एक स्वप्न आहे. ते म्हणजे आई वडिलांसाठी एक स्वतःचे छोटेसे घर घ्यायचे आहे. या यशात गोमतीला वडील बचनराम साहू, आई प्रभा साहू, भाऊ निळकंठ साहू, शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. मुदगुण, वर्ग शिक्षक संतोष चेंमटे, शिक्षक सुनील तायडे, सविता रंघवे, विशाल डुंबरे, मित्र, मैत्रिणी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व परिवारामुळे मला हे यश मिळाले आहे. दहावीच्या परीक्षेतील गोमातीच्यायशाबद्दल तिचे पंचक्रोशीतील तिचे कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!