Google Ad
Editor Choice Pune

पुणे जिल्हा (औंध) सामान्य रुग्णालयाचे … राज्यपाल यांच्याकडून पुरस्कार आणि कौतुक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्हा रुग्णालयातील विशेषता कॉरोना रुग्णावर अहो रात्र सेवा करून रुग्णाची काळजी घेतली बद्दल माननीय राज्यपाल श्री भगत कोशारी यांनी पुणे जिल्हा रुग्णालय ल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ संजय देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा रुग्णालयातील डॉ अशोक नांदापुरकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांनी यांनी कोरोनाच्या विभागाचे नियोजन रुग्णालयातील तज्ञ डॉ किरण खालाटे यांचे वर कोरोन विभागाची जबाबदारी दिली होती डॉ किरण खलाटे यांनी अत्यंत कशोशिने कोरोना विभागाचे अनेक वॉर्ड मध्ये रुपांतर केले.

या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी अधिपरीचारिक प्रमुख नेमल्या यामध्ये वैशाली कर्डिले , सुनीता कुंभार, प्रियांका जाधव , इंदू सरवदे, तांबे यांना नियुक्त करून वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिली. यामध्ये प्रामुख्याने ज्या अतिदक्षेचा विभाग मध्ये कोरोण रुग्णांना जेवण भरवण्याचे काम सर्व अधिदेविका नी केले व करत आहेत व ज्या रुग्णांना फारच अशक्त पणा आहे अशा सर्व रुग्णांना रुग्णालयातील वॉर्ड बॉय यांनी शौचालयाची ने आण जबाबदारी पार पाडली.

Google Ad

ह्या सर्व सूचना आरोग्य विभाग चे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी शासामार्फत दिल्या जाणाऱ्या गाईड लाइन्स अमलात आणली,  कोविड विभागात कोणाही नातेवाईकाना भेटण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने त्यांची सर्व काळजी डॉ किरण खलाटे यांचे आदेशाने अमलात आणण्याचे काम केले याच बरोबर या सर्व परीसेविका कडून नियाजनबद्द नेमणुका देण्याचे काम आधीसेविका कार्यालय मार्फत निवेदिता जव्हेरी आणि मंगल पांढरे व श्रीमती ढोबळे यांनी केले.

तरी सदर पुरस्कार मिळाले बद्दल विशेष पुणे जिल्हा रुग्णालयातील डॉ अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांचे अभिनंदन केले जात आहे. विशेषतः पुणे आरोग्य विभाग चे उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी शासनाची भूमिका जबाबदारीने पार पाडली म्हणूनच पुणे जिल्हा रुग्णालयाला राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे, यांचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

39 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!