Google Ad
Editor Choice india

राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र 14 न्यूज : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजन सोहळा सुफल संपन्न झाला. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ ५ जणांना स्थान देण्यात आलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. मग प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं.

Google Ad

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांनी प्रभू राम आणि उभारत असलेल्या मंदिराबाबत आपलं संबोधन केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामाच्या जयघोषात भाषणाला सुरुवात केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!