Google Ad
Editor Choice Health & Fitness

Australia : आली वेदनाविरहित कोरोना लस … एअर जेट मशीनद्वारे देणार लस

महाराष्ट्र 14 न्यूज : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, सध्या सर्व देशांचे लक्ष लागले आहे ते कोरोना लशीकडे तब्बल 70 हूनअधिक देश कोरोना लशीची ट्रायल करत आहेत. रशिया आणि चीन यांनी कोरोनाची लस तयार केल्याचा दावाही केला आहे. यातच आता आणखी देशानं सुईशिवाय लस तयार केल्याचा दावा केला आहे.

ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी 150 लोकांनी त्यांची नावे पाठविली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल.

Google Ad

हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते. डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. मॅनसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. डेली मेलच्या रिपोर्टनुसार नवीन लस थेट व्यक्तीच्या त्वचेपर्यंत पोहोचते. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये त्वचा महत्वाची भूमिका निभावते. म्हणूनच, त्वचेवर दिलेली लस अधिक प्रभावी ठरू शकते.

डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग म्हणतात की ही नवीन लस एखाद्या व्यक्तीच्या इम्यून सिस्टमवर डीएनएचा एक छोटा तुकडा ओळखून स्वतःचे अॅंटिजन तयार करेल या कल्पनेवर आधारित आहे. दरम्यान, एअर जेट सिस्टममुळे वेदना होतच नाही असे नाही. मात्र यामुळे सुई लावल्यानंतर त्वचेवर होणारी इजा कमी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने ही लस विकसित करण्यासाठी 30 लाख डॉलर्सचा निधी जाहीर केला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!