Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजपच्या सांगवी-काळेवाडी मंडल पदाधिकाऱ्यांचा प्रभाग ३१ ‘नवी सांगवी-पिंपळे गुरव’ नागरिकांच्या वतीने सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : तब्बल ७२ सदस्य असलेली सांगवी – काळेवाडी मंडल भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी आमदार लक्ष्मण जगताप आणि शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर यांनी जाहीर केली. जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना शहर भाजपच्या वतीने यात संधी देण्यात आली.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, राहटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी या भागाचा या कार्यकारणीत समावेश असून, आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून ‘आमदार लक्ष्मण जगताप’ आणि ‘आमदार महेश लांडगे’ यांच्या मार्गदर्शनाखाली या जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

Google Ad

या सांगवी-काळेवाडी मंडल कार्यकारणीत निवड करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ३१ ( नवी सांगवी – पिंपळे गुरव ) मधील ‘मारुती कवडे’ यांची प्रभाग ३१ अध्यक्षपदी तर सांगवी काळेवाडी मंडल उपाध्यक्ष पदी ‘डॉ. देविदास शेलार’, सुरेश तात्याबा शिंदे तसेच चिटणीस पदी भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार यांची निवड झाल्याबद्दल प्रभाग ३१ मधील नागरिक चंद्रकांत बेंडेे पाटील, रामदास पोखरकर, सबाजी पोखरकर , डॉ किसन मोरे, उद्धव कवडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जेष्ठ नागरिक ‘रामदास पोखरकर ‘म्हणाले, “आमदार लक्ष्मण जगताप यांचे आपल्या भागासाठी खूपमोठे योगदान आहे, आणि आपण निवड झालेल्या मंडल पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून जनतेची छोटी मोठी कामे करत आहात , अशीच कामे यापुढेही करत राहून आम्हास सहकार्य करावे, जनता सतत आपल्या पाठीशी राहुन आपणांस सहकार्य करेल”.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!