Google Ad
Maharashtra crimes

Mumbai : आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच … उद्या होणार सुटका ; कारागृह अधीक्षकांची माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर) : मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानची जामीनावर सुटका केल्याचा आदेश जारी केला असली तरी त्याची प्रमाणित प्रत वेळेत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला.

त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. आता आर्यन खानची उद्या सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी दिली आहे.

Google Ad

मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस कोर्ट सुटकेचे आदेश जारी करते. हायकोर्टाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची आणि जमानतीची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात.

क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान गेल्या 26 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. त्यामुळे आर्यन खान आज तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा असला तरी त्याची प्रत वेळेत पोहोचला नसल्याने त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने भूमिका बजावली.

आर्यन खान आज तुरुंगातून सुटणार असल्याची बातमी पसरताच आर्थर रोड तुरुंगाबाहेर आणि मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

120 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!