Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

एम. आय. डी. सी. परिसरात गांजा नावाचा अंमली पदार्थांची तस्करी करणा-या गुन्हेगाराला महाळुंगे पोलीसांनी ठोकल्या बेडया

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार श्री विनयकुमार चौबे यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी एमआयडीसी हद्दीमध्ये बेकायदेशीर / अवैध दारु जुगार, मटका, गांजा व अन्य अशा धंद्यावर प्रभावी कारवाई करून सदर धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार महाळुगे पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे यांनी महाळुगे पोलीस चौकीचे तपास पथकातील अमलदार याना गोपनीय माहीती काढून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक १५/०१/२०२३ रोजी पोलीस नाईक वाफळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि एक इसम खालुने परीसरात गाजा विक्री करण्याकरीता येणार आहे.

त्यानुसार वपोनि श्री ज्ञानेश्वर साबळे व पोनि (गुन्हे) श्री किशोर पाटील यांनी पोउपनि गायकवाड, पोना / १६९५ चाफळे, पेहवा / ४६७ नवले, पोना / पाटील, पोना / १२७३ वाजे, पोअं/२२७५ खैरे, पोअ/२८०० खेडकर, पोअ / २४३५ माटे पोअ / २२९५ खराडे यांचे पथक तयार करुन त्यांना पंच व योग्य साहित्यासह सामळ्याकामी रवाना केले असता, सुमारे १७.३० वा. दरम्यान एक संशयीत इसम त्या परिसरात आल्याने सापळा पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी करता त्याने त्याचे नाव मुन्ना कार्तिक नाहक रा. चाकण, मुळ राहणार ओडीसा असे सांगितले.

Google Ad

त्यांचे जवळील बॅग व गोनीची झडती घेता त्यामध्ये एकुण १० बॉक्स त्यात प्रत्येकी २.५ किलो गांजा असा २५ किलो गांजा किंमत अंदाजे ५,००,०००/- रुपये मिळून आला असून त्याने विरुद्ध एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपारा पोलीस उप निरीक्षक गायकवाड करीत आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!