Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

४४ लाख किमतीची आर . टी . ओ . रजिस्टर न झालेली नवीन फोर्चुनर कार चोरणाऱ्या चोरटयास … कार विक्रीच्या प्रयत्नात असताना गुंडा विरोधी पथकाकडुन अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ ऑक्टोबर) : दिनांक . १२/१०/२०२१ रोजी कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , बेंगलोर , कर्णाटक येथे चोरलेली नवीन फोर्चुनर कार विक्री करणे करीता इंदीरा कॉलेजजवळ , बँगलोर मुंबई हायवे ताथवडे , पुणे येथे येणार आहे , वगैरे मजकुराची बातमी मिळाली.

मंचक इप्पर पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली इंदीरा कॉलेजजवळ , बँगलोर मुंबई हायवे ताथवडे , पुणे येथे सापळा रचुन आरोपी चेतन बसवराज म्हेत्रे , वय २६ वर्षे , रा . विरभद्रेश्वर मंदीराजवळ , भातब्रा , ता . भालकी , जि . बिदर राज्य कर्णाटक यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन ४४,००,००० / – किं.रु. टोयोटा किर्लोस्कर कंपनीची फोर्चुनर कार पांढरे रंगाची आरटीओ नंबर नसलेली व मॉडेल नं . GUN166R – SXTHXX ही जप्त करण्यात आली.

Google Ad

ही कार चोरी बाबत राममुर्तीनगर पोलीस ठाणे , बेंगलोर , राज्य कर्णाटक गु.र.नं. ३८३/२०२१ भा.द.वि.क. ३७ ९ प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर आरोपी व फोर्चुनर कार राममुर्तीनगर पोलीस ठाणे , बेंगलोर , राज्य कर्णाटक येथील पोलीसांच्या ताब्यात रिपोर्टाने देण्यात आली आहे . सदरची कारवाई ही कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , डॉ. संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त ,

आनंद भोईटे . पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) मंचक इप्पर पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ १. प्रशांत अमृतकर सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे – १ ) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच . व्ही . माने , पोलीस अंमलदार – हजरत पठाण , प्रविण तापकिर , गंगाराम चव्हाण , विजय तेलेवार , गणेश मेदगे , रामदास मोहीते , शुभम कदम व ज्ञानेश्वर गिरी यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!