Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

सांगवीतील एका इसमाला ऑनलाइन बुकिंग करणे पडले चांगलेच महागात … पर्यटन ट्रॅव्हलींगच्या नावाखाली घातला गंडा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर) : सांगवीतील एक व्यापारी आशिष कुसुमाकर गोखले , वय ३६ वर्षे , पत्ता स.नं. १६/०१ , निवारा बंगला , मधुबन कॉलनी , गल्ली नंबर ०४ , जुनी सांगवी , पुणे यांना ऑनलाइन बुकिंग करणे चांगलेच महागात पडले. यात त्यांना १० हजार ७२९ रुपयांचा गंडा घालण्यात आला.

आशिष कुसुमाकर गोखले हे जुनी सांगवी येथे राहत असून त्यांना नितीन , पुर्ण नांव व पत्ता माहीती नाही, या नावाने २८ ऑक्टोबर रोजी ते राहत असलेल्या ठिकाणी मोबाईल क्रमांक ८८२ ९९९ १०७६ या वरुन त्यांना व्हॉट्सअप कॉल आला असता , तो आशिष यांनी नेहमीप्रमाणे उचलला . त्यावेळी समोरुन एक मुलगा आशिष यांच्याशी हिंदीमध्ये बोलत होता . त्याने त्याचे नांव नितीन असे सांगीतले .

Google Ad

त्याच दरम्यान आशिषला माझ्या मित्रांसाठी हॉटेलमधील दोन रुम बुक करावयाच्या असल्याने त्याने आशिषला फोनवर सांगीतले की , हॉटेलच्या रेटपेक्षा मी आपल्याला ४० टक्के कमी दराने रुम देतो . असे म्हटल्यावर आशिषने त्यास संमती दर्शविली . त्यानंतर आरोपी नितीन याने आशिषला एक मोबाईल क्रमांक त्याच्या मोबाईल वर व्हॉट्सअप केला . तो नंबर ८५२ ९९ ४२८५२ असा असुन , त्याने आशिषला असे सांगीतले की , या नंबरवरती तुम्हाला प्रथमतः काही रक्कम पाठवावी लागेल .

त्यामुळे आशिषने लागलीच आरोपीचे सांगणेप्रमाणे प्रथम रक्कम रुपये ०१,००० / – रजिस्ट्रेशन चार्ज म्हणुन पाठविले . त्यानंतर रक्कम रुपये ०२,५०० / – बुकींग चार्ज म्हणुन पाठविले . ०१,७०० / – रुपये जेवणाचा चार्ज म्हणुन पाठविले . ० ९ ५० / – रुपये व्हेरीफिकेशन चार्ज म्हणुन पाठविले . ०१,४५० / – रुपये नाष्ट्याचा चार्ज म्हणुन पाठविले . ०२,००० / – रुपये पर्यटन ट्रॅव्हलींगचा चार्ज म्हणुन पाठविले . व शेवटी ०१,१२ ९ / इन्सुरंशचा चार्ज म्हणुन असे एकुण वेळोवेळी रक्कम रुपये १०,७२ ९ / – रु अशी ऑनलाईन पध्दतीने आरोपीने घेऊन आशिष गोखले यांची फसवणुक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तांबे हे करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!