Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

भोसरी येथे खुनाच्या गुन्हयातील पॅरोल वर फरारी असलेल्या आरोपी कडून जप्त केले … चार देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जुलै) : दिनांक २७/०७/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे , पोलीस उप निरीक्षक बी . आर . गोसावी , पो.हवालदार चंद्रकांत गवारी , पो.कॉ.  प्रविण मुळुक , पो.कॉ. सागर शेळके शस्त्रविरोधी पथक गुन्हे शाखा असे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पो.कॉ. /  प्रविण मुळुक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि , “ महाराजा टि स्टॉल जवळ , इंद्रायणीनगर , एम . आय . डी . सी . भोसरी , पुणे येथे एक इसम हा त्याचे पाठीवरील निळे रंगाचे बॅगमध्ये पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे .

” अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर पथकाने सापाळा लावुन थांबले असता आरोपी वेदांत विलास माने वय २५ वर्षे , रा . साईधाम हॉस्पीटल मागे , लांडेवाडी , भोसरी , पुणे हा सदर ठिकाणी आला असता त्यास पोलीसांचा संशय आल्याने तो पळुन जावु लागल्याने त्यास पथकातील पोलीसांनी पाठलाग करून पकडले त्यावेळी त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक पिस्टल लावलेले आढळुन आले व त्याचे पाठीवरील बॅग तपासली असता त्यामध्ये तिन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे मिळुन आली .

Google Ad

या प्रमाणे सदर आरोपी कडे एकुण चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकुण १०२१०० / – रु मुद्देमाल मिळून आला . आरोपीची अधिक चौकशी केली असता सदर आरोपी हा भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र . ३ ९ ६ / २०१६ भा.द.वि. कलम ३०२ मधील पॅरोलवर फरार असल्याचे आढळून आले . आरोपीने सदर पिस्टल हे मध्यप्रदेश येथुन विक्री साठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द एम . आय . डी . सी . भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र . ४४७/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) . महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( २ ) सह १३५ प्रमणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे साो , अपर पोलीस आयुक्त श्री डॉ . संजय शिंदे सो श्री काकासाहेब डोळे सो . पोलीस उप आयुक्त गुन्हे , सहा , पोलीस आयुक्त प्रशात अमृतकर सो सहा पोलीस आयुक्त पद्माकर घनवट सो , पिंपरी चिंचवड  यांचे मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे , पोलीस उप निरीक्षक बी . आर . गोसावी , सह फौजदार शिंदे , सहा . फौ / वाव्हळे , पो . हवालदार गवारी , पोलीस हवालदार प्रितम वाघ , पो . हवालदार शेख , पो.कॉ. मुळुक , पो . कॉ  आत्तार , पो.कॉ. शेळके , पो हवालदार माळी , तांत्रीक विश्लेषन विभाग यांचे पथकाने केली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बी.आर. गोसावी व एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे करीत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!