Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

एक नगरसेवकासह, देहू संस्थानच्या दोन विश्वस्तांना जुगार खेळताना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑगस्ट) : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव ते येलवाडी रोडच्या उजव्या बाजूस एस.एच.ई.पी.एल. हेव्ही इंडस्ट्रिअल फॅब्रिकेशन लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती दरोडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, बुधवारी पहाटे या ठिकाणी छापा मारण्यात आला. यावेळी २६ जण तीन पत्त्यांचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींकडून दोन मोटारी, १८ दुचाकी, मोबाईल असा ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील येलवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहू संस्थानाचे दोन विश्वस्त, देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक आणि एका राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलेच्या पतीसह २६ जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून एकूण ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Google Ad

पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकातील पोलीस नायक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी याप्रकरणी म्हाळूंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये देहू संस्थानचे विश्वस्त संतोष गुलाब मोरे, विशाल केशव मोरे तर देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आदित्य चिंतामणी टिळेकर यांचा समावेश आहे. तसंच एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेच्या पतीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

देहू संस्थानचे विश्वस्त आणि नगरसेवकाला अटक झाल्याने या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. शेखर गुलाब परंदवाड (वय ५०, रा. देहूगाव), विशाल प्रतापसिंह परदेशी, संतोष केशव टिळेकर, संतोष शांताराम कडूसकर, विशाल पोपट काळोखे, मारुती भीमाजी वाळुंज, अमित अमृत नलावडे, अनिल नागनाथ वाघमारे, विनायक विक्रांत गाडे, संदीप रंगनाथ आव्हाड, राहुल गुलाब येवले, विश्वास दत्तू भिंगारदिवे, राहुल सुभाष कुऱ्हाडे, विजय गोपाळ पडवळ, अमोल युवराज बोरसे, मयूर चंद्रमणी घनवट, योगेश केशव मोरे, सचिन बापू खरात, नवनाथ दशरथ टिळेकर, अप्पा बाळू लोखंडे, मोहम्मद दाऊद सय्यद, मोहन सहादू लोखंडे, भारत नानासाहेब विधाते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement