Google Ad
Editor Choice Pune District

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या पुणे व पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांची नेमणूक !

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. २६, जानेवारी ) : महाराष्ट्रामध्ये शून्यातून रक्तदानाची चळवळ उभी करून रुग्णांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या ‘शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या संस्थेची आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर शिवशंभू ट्रस्ट चे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे व महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख अप्पासाहेब घोरपडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन पुणे शहरामध्ये पदनियुक्ती करण्यात आली.

Google Ad

गावाकडून येणाऱ्या रुग्णांना पुण्यामध्ये रक्ताच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता हे लक्षात घेऊन पुणे शहर प पिंपरी चिंचवड शहराची पदनियुक्ती करण्यात आली, असे शिवश्री भूषण सुर्वे यांनी यावेळी सांगितले व यापुढे पुण्यामध्ये राजुतदान शिबिराचे आयोजन करून प्रत्येकाला मोफत बॅग उपलब्द करून देण्याची संकल्पना असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

🔴पुणे शहर पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-

पुणे शहर महिला अध्यक्ष – सोनालीताई जाधव, पुणे शहर प्रमुख – रोहित डोळस, पुणे शहर संपर्क प्रमुख – शेखर पवार, पुणे शहर कार्याध्यक्ष – राहुल भोसले, पुणे शहर संघटक – विशाल पवार

🔴पिंपरी चिंचवड पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-

पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख – परशुराम लोखंडे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख – कुमार सकट, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष – सुहास नेटके

यापुढे जोमाने काम करून सामाजिक कार्यात शिवशंभू ट्रस्ट सोबत रक्तदानाची चळवळ आम्ही हि मोठ्या प्रमाणात करू असेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

76 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!