Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील राहटणी येथील ‘न्यू सिटी प्राईड स्कूल’मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये २६ जानेवारी हा ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन संतोष कोकने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व लेझीमचे आयोजन करण्यात आले होते तसेच परेड करण्यात आले.

नगरसेविका  निर्मला कुटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, संत तुकाराम महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक विष्णू तांबे,   सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कारभारी, तात्या शिनगारे, लायन्स क्लबचे सेक्रेटरी अंजुम सय्यद, इंदू सूर्यवंशी, अनिता कांबळे, दीपक नागरगोजे, भिकोबा तांबे स्कूलचे मुख्याध्यापक विजय सर्जे, युवराज प्रगणे  मनपाचे  कनिष्ठ अभियंता संदीप चाबूकस्वार, संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

Google Ad

प्रजासत्ताक दिनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कॅप्टन संतोष कोकणे म्हणाले, आपला देश हा ७१वर्षापूर्वी साधी टाचणी बनवण्यास पात्र न्हवता, परंतु आज देश  चंद्रमोहीम ,मंगळमोहीम द्वारे आकाशाला गवसणी घालत आहे, ही अभिमानाची बाब आहे, तसेच पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट येथे कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशानेच सर्वात प्रथम बनवली असल्यामुळे आपल्या देशाचा जगात नावलौकिक झाला आहे. १९५० ला लावलेले इवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष ठरत आहे” याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.

आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली काळे व उत्कर्षा पाटील यांनी केले. तर सचिन कळसाईत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

80 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!