Google Ad
Editor Choice india

आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधी मुंबईच्या टीमला मोठा धक्का …

महाराष्ट्र 14 न्यूज : आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधी मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मागच्यावर्षी मुंबईला आयपीएल जिंकवून देणाऱ्या लसिथ मलिंगाने यंदाच्या वर्षी माघार घेतली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या टीममध्ये मलिंगाच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिनसन याची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगा यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही, तो त्याच्या कुटुंबासोबत श्रीलंकेमध्ये असेल, असं मुंबईच्या टीमने सांगितलं आहे.

‘लसिथ मलिंगा हा मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आणि टीमचा आधार आहे. आम्ही मलिंगाची खंत आम्हाला या मोसमात नक्कीच जाणवेल. पण मलिंगाचं त्याच्या कुटुंबासोबत असणं जास्त महत्त्वाचं आहे. जेम्स पॅटिनसन आमच्या टीमसाठी योग्य आहे, तसंच आमच्या फास्ट बॉलरमध्ये तो एक चांगला पर्याय आहे,’ असं मुंबईच्या टीमचे मालक आकाश अंबानी म्हणाले.

Google Ad

लसिथ मलिंगाचे वडिल आजारी आहेत, त्यांच्यावर काही दिवसांमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे, त्यामुळे मलिंगा आयपीएलसाठी दुबईला जाणार नसल्याचं बोललं जातंय. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएललला सुरुवात होणार आहे, पण अजूनही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही.

लसिथ मलिंगा हा आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. आयपीएलमध्ये मलिंगाने सर्वाधिक १७० विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये मलिंगा ड्वॅन ब्राव्होनंतर सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे.

मलिंगाच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईकडे जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाईल, ट्रेन्ट बोल्ट, मिचेल मॅकलेनघन, धवल कुलकर्णी आणि जेम्स पॅटिनसन हे फास्ट बॉलरसाठीचे पर्याय आहेत. तर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!