Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने झेंडा विक्रीची नवी सांगवी -पिंपळे गुरव मध्ये सुरुवात … नागरिकांनी केली गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑगस्ट) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १५ ऑगस्टला “हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने माफक दरात नागरिकांकरीता झेंडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेने तिरंगा झेड्यासाठी निविदा काढल्या होत्या, त्यानुसार शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयात तसेच प्रभाग स्थरावर तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले असून प्रति झेंडा २४ रुपये या प्रमाणे प्रति व्यक्ती पाच झेंडे देण्यास आज सुरुवात करण्यात आली.

Google Ad

नवी सांगवी -पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह तसेच राजमाता जिजाऊ उद्यान येथे तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून एका केंद्रावर फक्त शंभर झेंडे उपलब्ध झाल्याने ते लगेचच संपल्याने काहींना निराश होऊन परतावे लागले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!