Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे वेधशाळेने दिला इशारा … बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पावसाचे संकट

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात परतीच्या पावसानेही धुमशान घातले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. पावसाचा जोर ओसरत नाही, तेच पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे २०,२१ आणि २२ तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

Google Ad

 

भारतीय हवामान विभागाने याआधी १७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली होती. पण, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आणखी वाढले आहे.

दोन दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, वातावरण बदलल्याने परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली. ऐन हंगामाच्या काळात हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली होती. पण, परतीच्या पावसात सर्व काही डोळ्या देखत वाहून गेलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!