Google Ad
Editor Choice

वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले, वादावर मी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ डिसेंबर) : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अखेर त्यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी माफी मागितली आहे.त्यांनी काही दिवसांपूर्वी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर त्या वक्तव्याचा निषेध करत शाईफेक देखील करण्यात आली होती. हा सर्व गदारोळ सुरु असताना आता मात्र, त्याच वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत जाहीर माफी मागितली आहे.

▶️दादा म्हणाले …

Google Ad

माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. असे त्यांनी पत्रकामध्ये म्हंटले आहे.

पुढे ते म्हणाले की, मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती. अशी देखील विनंती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपने रविवारी (दि.11) निदर्शने केली होती. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी चौकात शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीनेही निषेध नोंदवला गेला होता.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!