Google Ad
Editor Choice

तंबाखू नियंत्रण चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज – डॉ. सुहासिनी घाणेकर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ डिसेंबर) : लहान वयात व तरुणात तंबाखूचे व्यसन करण्याचे प्रमाण वाढले असून मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, यामुळे कुटुंबावर अर्थिक भार वाढल्याने कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था कोलमडून जात आहे याला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुवासिनी घाणेकर यांनी केले.

पुणे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक स्वप्ना गोरे यांच्या प्रयत्नाने कोटपा 2003 तंबाखू नियंत्रण कायदा याच्या प्रभावी अंमलबजावणी करता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. घाणेकर बोलत होत्या. यावेळी राज्य अधिकारी जीया शेख यांनी कोटपा कायद्याच्या विविध कलमांची माहिती दिली. कोटपा कायदा त्याचे अधिकार व कर्तव्य तसेच अधिकाऱ्यांची भूमिका यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

Google Ad

शहरातील पान टपऱ्या, हुक्का बार, शालेय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण व त्यावरील कार्यवाही याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कॅन्सरचे वाढते प्रमाण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चालणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. पिंपरी चिंचवड नार्कोटिक्स विभागाचे उपनिरीक्षक प्रशांत महाले यांनी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व त्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाही याबाबत माहिती दिली.जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे समुपदेशक हनुमान हाडे यांनी तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात तसेच समुपदेशन करून तंबाखू कशी सोडली जाते याची माहिती दिली सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी भोसले यांनी मानले. कार्यशाळेसाठी पिंपरी चिंचवड मधील खंडणी विरोध पथक, दरोडा विरोधीपथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, नार्कोटिक्स विभाग, सायबर क्राईम, वाहतूक शाखा आदी विभाग तील एकूण 15 पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!