महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. १४ ऑगस्ट २०२० ) रोजी ९९० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९१९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ७१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर आज १२१९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आज मृत झालेले रुग्ण भोसरी (स्त्री ४७ वर्षे), निगडी (स्त्री ८४ वर्षे, पुरुष ६७ वर्षे), मोशी (पुरुष ४८ वर्षे), तळवडे (स्त्री ५८ वर्षे, स्त्री ५८ वर्षे), रहाटणी (पुरुष ५१ वर्षे), चिंचवड (पुरुष ७९ वर्षे, पुरुष ६७ वर्षे), थेरगाव (स्त्री ७१ वर्षे), दापोडी (पुरुष ७८ वर्षे), देहुरोड (पुरुष ६८ वर्षे), जुन्नर (स्त्री ६३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
5 Comments