Google Ad
Uncategorized

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य कोणत्या शिवसेनेला मिळणार आणि कोण दिल्ली गाठणार याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्यांदा मावळ मध्ये आघाडी घेण्यास यशस्वी होतात की महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे बारणे यांच्या विरोधातील सुप्त नाराजीच्या लाटेचा फायदा घेण्यास यशस्वी ठरतात, याबाबत मोठी उत्सुकता मतदार आणि कार्यकर्त्यांत लागून राहिली आहे.

▶️चिंचवड भाजप ठरविणार मावळचा विजय

Google Ad

शिवसेनेच्या दोन्ही गटांत लढत असलेल्या मावळ मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत ४.५८ टक्क्यांनी मतदान घसरून यंदा ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. मात्र येथेही मतदारांची संख्या सुमारे ५२ हजारांनी वाढली आहे. उद्धव ठाकरेविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी थेट लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा घेत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे हॅटट्रिक करणार की शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे त्यांना रोखणार?, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात तर तीन रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आहेत. याठिकाणी ५२.२०% मतदान झाले आहे. त्यामुळे याच मतदार संघावर विजयाची गणिते ठरणार आहेत.

मावळ तालुक्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप हे दोन प्रबळ पक्ष असून, त्यांची ताकद लक्षात घेता आणि दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युतीधर्माचे पालन करून काम केले असल्यास, बारणे यांची स्थिती किमान ६०-४० टक्के अशी राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपने युती धर्माचे पालन केल्याचे भाजप च्या प्रचार यंत्रणेवरून दिसत होते, २०१९ च्या तुलनेने मतदान ही कमी झाले, तसेच युती धर्मात दगा फटका झाल्यास व सर्वसामान्य मतदार विद्यमान खासदारांबाबतच्या नाराजीच्या लाटेवर स्वार झाल्यास, बरोबरी अथवा या उलट स्थिती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात मोठ्या नेत्यांच्या सभा ही या मतदारसंघात तुलनेने कमी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचा उमेदवार नसल्याने या स्थितीचा आगामी काळात युतीवर परिणाम होणार नसला, तरी संशयाचे वातावरण मात्र कायम राहील हे मात्र नक्की…

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!