Google Ad
Editor Choice Pune District

पुणे जिल्हाधिकारीपदी कोण ? कोरोना संकटाच्या काळातही कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु !

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे . पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातूनच पुणे जिल्हाधिकारी पदावरील नियुक्तीचा प्रश्न भिजत पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात आधीच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यातच प्रशासनाचा प्रमुख असणारं जिल्हाधिकारी पदही रिक्त असल्याने याचा परिणाम उपाययोजनांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष सुरु आहे. तिन्ही राजकीय पक्षांना पुणे जिल्हाधिकारी म्हणून आपल्या मर्जीतील अधिकारी हवा आहे. यासाठी तिन्ही राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा आहे.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!