महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२२ऑक्टोबर) : निष्पाप व्यंकटेश च्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पिंपरी -चिंचवड युवा सेनेची मागणी केली आहे. सर्वत्र आनंद उत्साह दिवाळीची लगबग आणि ऐन दिवाळीत ठेकेदाराचा कामातील दिरंगाईपणामुळे कासारवाडीतील निष्पाप व्यंकटेशला या जगातून अखेरचा निरोप घ्यावा लागला गेल्या अनेक महिन्यांपासून कासारवाडी मध्ये रस्त्याचे खोदकाम सुरू आहे त्यातूनच रस्ते नूतनीकरणाच्या नावाखाली संपूर्ण कासारवाडी मध्ये खोदाई सुरू करण्यात आले परंतु अद्याप पूर्णत्वास एकही रस्ता आलेला नाही.
ठेकेदाराच्या दिरंगाईपणामुळे व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या व्यंकटेश ला आपला जीव गमवावा लागला त्यातूनच या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत मृत व्यंकटेश च्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी पिंपरी युवा सेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने माननीय अतिरिक्त आयुक्त यांना करण्यात आली.
त्याप्रसंगी चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी उपविधान सभा अधिकारी अविनाश जाधव , नितिन पाटिल युवासेना समन्वयक चिंचवड विधानसभा,राजेश पाटिल, विशाल भातंबरेकर, सैपन मुजावर,निजाम मुजावर उपस्थित होते.